स्पर्धेसाठी
जीवनात श्रमाला महत्व
श्रम म्हणजे सतत कोणत्या ना कोणत्या कार्यात स्वताःला गुंतवणे होय . श्रमाचे बौद्धिक व शारीरिक असे प्रकार दिसून येतात .
श्रमाचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंगी व मधमाशी .हे दोन्ही कीटक अविरतपणे न कंटाळता कार्यरत असतात.काम केल्याने क्रियाशिलता वाढीस लागते ."प्रयत्नांती परमेश्वर " असे म्हटले आहे .
"केल्याने होत आहे रे आहे रे आधी केलेची पाहीजे " या उक्तीप्रमाणे फक्त फळाची अपेक्षा न बाळगता जर क्रियाशिल राहीले तर यश नक्कीच मिळते .या यशाला जर कौतुकाची जोड मिळाली तर संधीचे सोने व्हायला वेळ लागणार नाही .
कार्यरत व सतत प्रयत्नशील व्यक्तिंचा जर एखादे निमीत्त साधुन जर गौरव केला तर त्यांना आणखीन प्रेरणा मिळते.त्यामुळे श्रमाला कधीही कमी लेखु नये.
"श्रम करने में ही जीवन की सफलता है " असेही म्हटले जाते कारण काहीही न करता निव्वळ बसून राहण्याने आळस वाढतो व रोगाला निमंत्रण दिले जाते . श्रमाने शरीर लवचिक बनते. स्नायू कार्यरत असल्यामुळे ऊत्साह वाढतो व कामे वेळेवर होतात.
सध्या आमीर खानने "वॉटरकप " स्पर्धा सुरु केली आहे . त्यामध्ये श्रमाला जास्तीत जास्त महत्व दिले आहे.दुष्काळी भागात पाण्याचे जे दुर्भिक्ष जाणवत आहे त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र जलमय करण्यासाठी८ एप्रील पासून सुरु झालेल्या या स्पर्धेमध्ये खड्डे काढणे , बांध घालणे , चर खोदणे व त्यात पाणी साठवण्यासाठी गावक-यांना व 1मे रोजी शहरवाशीयांना त्याने आवाहन केले आहे की या मोहीमेमध्ये सहभागी व्हा .ईथेही आपल्याला श्रमाचे महत्व जाणवते .
🙏🙏 🙏 जय महाराष्ट्र , जय कामगार दिन 🙏🙏🙏
✍✍✍✍✍✍✍✍
श्रीमती माणिक क.नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106
9881862530 .
No comments:
Post a Comment