स्पर्धेसाठी
✍ आईस पत्र ✍
प्रिय आईस ,
साष्टांग सप्रेम नमस्कार
आता पत्र लिहण्यास कारण की आता मे महीना सुरु झाला .सगळ्यांच्या बरोबर मलाही माहेरचे वेध लागलेत मुलांना सुट्या पडल्यात .सर्वजण मामाच्या गावाला जायला ऊत्सुक आहेत .
मला माहीत आहे तुही आमची वाट पहात असणार आई , तुला बघुन किती दिवस झाले गं .तुझी खुप आठवण येते .आपण आठवण झाली की मोबाईलवर बोलतो .व्हीडीओ कॉलींग करतो .पण या सर्वात तो जिव्हाळा , प्रेमाचा स्पर्श नसतो .
आई तुझ्याजवळ बसुन प्रेमाच्या चार गोष्टी बोलताना मला स्वर्गसुखाचा अनुभव मिळतो .मीही एक आई आहे . पण आईच्या प्रेमाचा अनुभव तो घेतल्याशिवाय मिळत नाही आज माझी मुलं मी पाहते माझ्यासाठी वेडी होतात .ती कीतीही संकटात असली तरी माझ्या अस्तीत्वानेच त्यांच्यात एकप्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो .
आई तु हे सर्व प्रत्यक्ष अनुभवलयस , हो ना ? आज मी तुझ्या भावना सहज ओळखु शकते .मी लहान असताना याची काहीच कल्पना नव्हती .कीती त्रास द्यायचो आम्ही भावंडे तुला ? पण तू हे सर्व सहज सोसायचीस .कीती महान आहेस आई तू !!
साने गुरुजींनी म्हटलं आहे आई माझा गुरु ," आई कल्पतरु ,सौख्याचा सागरु आई माझी " खरच आई तू सुखाचा सागर आहेस .आई या शब्दातच आत्मा व ईश्वर सामावलेले आहेत .देवाला सगळीकडे जाता येत नाही म्हणून , आई देवाने तुला निर्माण केलय .
तू आम्हाला चांगले संस्कार दिलेस .गरीबीतही कस सन्मानाने जगायच हे तू आम्हाला तुझ्या कृतीतून दाखवून दिलेस .तुझे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.घरच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत तू नोकरी करत आम्हाला शिकवलस , मार्गी लावलस खरच आई मला तुझा सार्थ आभिमान आहे .कारण घरात अनेक कामे असतात हे सर्व तू विनातक्रार पार पाडलीस .
आज तुझी नातवंड तू दाखवून दिलेल्या मार्गानेच जात आहेत व यशस्वी होत आहेत .तू निश्चींत रहा .घरी आल्यावर त्यांना तू भेटुन तुझं मत प्रकट कर.नक्कीच तुला आनंद होईल .
तू नेहमी आनंदी रहाव , तंदुरुस्त रहाव हीच माझी मनिषा आहे . तब्येतीला जप.फीरायला जातेस ना ? वेळच्यावेळी डॉक्टरांना जाऊन भेट व तपासण्या करुन घेत जा .आम्ही येतोय सगळे तुला भेटायला .
वाट पहा .
तुझीच लाडकी
माणिक
✉✉✉✉✉✉
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता .शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106 .
9881862530
No comments:
Post a Comment