Tuesday, 23 May 2017

पाऊसधारा

पाऊसधारा

पावसाच्या धारा आल्या ,
प्रतिक्षा आता संपली .
गार तुषार अंगी स्पर्शिता ,
रोमांचीत काया झाली .

शांत वेली , शांत झाडे ,
निसर्ग अवघा शांत झाला .
पावसाच्या धारामध्ये ,
जो तो नाचू-गाऊ लागला .

आहे हवा अजून पाऊस ,
नको आता रुसुन बसू .
आनंदाच्या या क्षणी दे ,
सकलांच्या वदनी तू हसू .

वृक्ष लावू सगळीकडेच ,
तुझ्या स्वागताची तयारी .
पाहुनी वृक्ष सगळीकडे ,
नाचतील आनंदात सारी .

✍ कवियीत्री ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

No comments:

Post a Comment