Thursday, 25 May 2017

पेरणी

स्पर्धेसाठी

        चित्रकाव्य

           पेरणी

झाली नांगरणी, मशागत ,
पेरणीला मी झालो तयार .
घेऊन जोडी सर्जा-राजाची ,
जोडली एक चवड पाभर .

बांधुन झोळी कमरेला ,
पेरणी करतोय नेटानं .
एक चवडीची पाभर माझी ,
धान्य पेरतीय नेकीनं .

बैलं माझी शुभ्र-धवल ,
लाल शिंगे शोभे शिरावरी .
आधुनिक पोशाख अन् टोपी
शोभून दिसतोय अंगावरी .

निरभ्र आकाश वरती छान ,
हिरवी धरती सजली खाली.
आवरु आता कामे आपली,
वेळ पावसाची ती आली .

   ✍  रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

No comments:

Post a Comment