Sunday, 7 May 2017

कासाविस जीव

चित्रावरुन कविता

      स्पर्धेसाठी

     कासाविस जीव

  पाण्यासाठी घेतली मी ,
  डोक्यावरती ही कळशी .
  हातात काठी वार्धक्याची ,
  आधार मजला देशी .

  खंगली माझी काया ,
  पिकले काळे केस .
  वाहुन पाणी उन्हात ,
  आलाय तोंडाला फेस .

  रणरणत्या ऊन्हात ,
  रस्ता तो तापलाय .
  म्हणुनच मी आज ,
  आडवाटेचा रस्ता धरलाय .

  झाली वस्त्रांची दशा ,
  करपून जाय चेहरा .
  कासाविस जीव माझा ,
  आहे का यावर उतारा ?

💧💧💧💧💧💧💧

✍✍ कवयित्री✍✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106

No comments:

Post a Comment