जुनं ते सोनं
चालताना पाय थकत नव्हते ,
आता चालणच नको झालय .
गावापासून लांब कॉलेज ,
मिळून चालत जात होतो .
सायकलची तर बातच सोडा ,
गाडीशिवाय चालतच नाही .
पूर्वी बोलत जात होतो ,
आता फोनच जादा बोलतो .
संवाद चाललाय हरवत ,
सोबत फक्त नावालाच असते .
शेजारी राहतय कोण याची ,
यात भ्रांतच कुणाला नसते .
पारकट्टा पूर्वीचा पडलाय ओस
तरुणपीढीची पहात वाट .
सायबर कँफेला भुललाय ,
पाहुन त्याचा रोज नविन थाट .
सणसमारंभ झालेतच गायब ,
सहकार्य करण्या कुणी येईना .
आठवण जुन्या काळाची ,
घरदारातील गर्दी हटता हटेना .
व्यायामाला नव्हती तोड ,
घोटीव शरीर पिळदार दंड .
आता एकएक अवयवांनी .
पुकारलाय मोठा बंड .
आता तरी शहाणे व्हा ,
जुनं ते सोनं ठेवा ध्यानी .
कीतीही आधुनिक झालो तरी ,
भूतकाळाला ठेऊया मनी .
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर ,416106
No comments:
Post a Comment