स्पर्धेसाठी
चित्रकाव्य स्पर्धा
माझा सर्जा
झाली उन्हानं काहीली ,
तगमग जीवाची वाढली .
रस्ता झाला आता गरम,
लाही अंगाची हो झाली .
बैलगाडी माझी कामात ,
सर्जा तापतोय उन्हात .
पाहुन जीव कळवळे , गोणपाटाची छाया झोकात .
तूला मिळूदे सावली ,
माझा विचार नको करु .
मिळून आपण दोघ ,
मार्ग कष्टाचा आता धरु .
आधार तू माझा एकला ,
जपायलाच हव तूला .
कुटुंबाच्या माझ्या आता,
पोशिंदा तूच झालास .
चल जाऊ झोकात ,
काम करु झकास .
करुन अडचणींवर मात
सुंदर करु जीवन भकास
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता . शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
9881862530
No comments:
Post a Comment