स्पर्धेसाठी
विषय - वसंत बहरला
शिशीराचे राज्य संपले ,
दिसे पानगळीची अवकळा . ग्रीष्म आला पाठीमागून ,
वसंत बहरला गेली कळा .
वसंताच्या आगमनाने ,
फुलली , सजली धरणीमाता
चराचरात जागवली त्याने ,
नवजीवनाचे धुमारे आता .
आनंद भरला चोहीकडे ,
पालवी फुटली सगळीकडे .
गर्भरेशमी हीरवाईची जशी ,
शाल पांघरली धरतीवर .
मंजुळ गायन करी कोकीळा
आसमंत सारा भारावला .
उत्साहाचे बीज घेऊनी ,
यशकीर्तीकडे झेपावला .
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment