Sunday, 21 May 2017

विचारमंथन

स्पर्धेसाठी

विषय -- शाळा प्रवेश आणि पालकांची अवस्था

      शाळा म्हटले की विद्यार्थी , पालक , शिक्षक व शिक्षण ओघानेच येते . आज आपण सर्वत्र पाहतो शाळांचे पेव फुटले आहे . जो तो शाळा सुरु करत आहे . एकाच गावात अनेक शाळा सुरु होत आहेत .
  
    शाळा सुरु करणारे गावातीलच पुढारी असतात. पैशाच्या जोरावर ते सुरु करतात , पण तिथे प्रवेश घेण्यासाठी संबंधित लोकांना वेठीस धरले जाते. मराठी माध्यमाच्या शाळा शेजारीच असतात पण छानछौकीपणामुळे पालक या शाळांकडे ओढला जातो सुरवातीला बरे वाटते पण नंतर वास्तवता लक्षात येते.

     काहींना याची कल्पना नसते.मुल जन्माला आले की पालकांना त्याच्या शाळेच्या चिंतेने ग्रासले जाते   पैसा असणारे सहज प्रवेश मिळवू शकतात . पण काहीजणांची स्वःताची व मुलाची बौध्दिक क्षमता नसतानादेखील अशा महागड्या शाळेत प्रवेश घेतात व नंतर मग ईकडे आड अन तिकडे विहीर अशी अवस्था होते .

    मागील वर्षाचा निकाल आजून लागत नाही तोपर्यंत शाळाप्रवेशासाठी विविध शाळांतील शिक्षक घरी यायला सुरवात होते.अशावेळीही पालक संभ्रमात पडतो.हे चित्र आहे ग्रामीण भागातले.
      शहरी भागात चित्र वेगळे असते. तिथे शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्याबरोबर पालकांचीही परीक्षा घेतली जाते. अशावेळी पालक तणावपूर्ण वातावरणात असतो . काहीवेळा तर प्रतिष्ठेचा प्रश्न उद्भवतो .

    हे सर्व अती होतय.हे कुठेतरी थांबायला हवे . पूर्विसारखी आनंददायी शिक्षणपध्दती आली पाहीजे.आता पालकांनी  जागरुक होउन , नीट विचार करुन, कुठल्याही अमिषाला बळी न पडता . आपली व मुलाची पात्रता बघून योग्य शाळेत प्रवेश घेतला पाहीजे .

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106

No comments:

Post a Comment