प्रीतीचा झरा
सुकलेला प्रीतीचा झरा ,
शब्दांनी फुलला खरा .
स्वप्नांना फुटले धुमारे ,
ध्यास तुझाच लागला रे .
भूत भविष्याचा वेध घेता ,
वर्तमानात लागला शोध .
झोका विचारांचा लागला झुलू,
प्रितीचा गंध लागला खुलू .
सौंदर्याची साथ असुनही ,
शब्दांमृतांची आस अजुनही
हरवलेल्या स्वप्नांना जिद्दीचे बळ ,
पूर्ण होण्या त्यांची चालते खळबळ .
ॲपसाठी
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
mknagave21 @gmail .com
9881862530
15 / 05 /2017
No comments:
Post a Comment