*काव्यप्रेमी शिक्षक मंच*
व *काव्यप्रेमी परिवार*
➖➖➖➖➖➖➖
*आजचा उपक्रम*
*विषयावरून कविता*
🌷 *विषय*🌹
*मामाचा गाव*
*दिनांक*
*११/४/२०१७*
ओढ लावतो जिवाला ,
छान गाव माझ्या मामाचा .
चिंचा ,बोरे ,कै-या ,रानमेवा ,
आहे मला भरपूर खायचा .
आईबरोबर मलासुद्धा ,
आवडतो माझा मामा .
नेहमीच असतो तयार ,
येतो आमच्या कामा .
गाव माझ्या मामाचं ,
सर्वांच्याच आवडीचं .
सुट्टीतल्या आनंदासाठी ,
आहे स्वर्गाच्या तोडीचं .
संपते कधी शाळा ,
मन झालय अधीर .
गाव माझ्या मामाचा ,
आहे खुपच दूर .
माया आजी-आजोबांची ,
लावते मला लळा ,
आतूर मन भेटीला ,
लागेन कधी त्यांच्या गळा .
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment