स्पर्धेसाठी
विषय -- मुक्त खुली कविता स्पर्धा
कसरत पाण्यासाठी
रविराज तो तापला ,
झाली काहीली जीवाची .
वृक्षतोड केली आम्ही ,
भोगतोय सजा त्याची .
माणसाबरोबर धरतीही ,
शोधतेय आता पाणी .
सहन करतात चटका मुले ,
पाय त्यांचे अनवाणी .
घोटभर पाण्यासाठी ,
फीरतोय मी वणवण .
एक थेंब पाण्याचा ,
देतोय दुष्काळाची आठवण
बापलेकांची चाले आता ,
पाण्यासाठी कसरत .
नाश नको पर्यावरणाचा ,
चाललोय आपण विसरत .
भागवा रे तहान ,
या दोन थेंबावरती .
हिरवाईचे रक्षण करु ,
जबाबदारी घेऊ खांद्यावरती
✍ कवियीत्री ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर ,416106
mknagave21 @gmail.com
No comments:
Post a Comment