स्पर्धेसाठी
रक्तदान श्रेष्ठ दान
"आरोग्यम् धनसंपदा "असे
म्हटले जाते .शरीरस्वास्थ्य ठीक असेल तरच मानव आनंदी राहू शकतो . यासाठी त्याच्या शरीरातील सर्व घटक योग्य प्रमाणात असावे लागतात. तसेच रक्ताचे आहे .
रक्त शरीराला आवश्यक असणारा घटक आहे.याशिवाय शरीराला शून्य किंमत आहे .म्हणू याचे शरीरातील प्रमाण योग्यच हवे .जरा ते कमी झाले किंवा त्यातील एखादा घटक कमी झाला तर ते जीवावर बेतु शकते .
जर एखादा अपघात झाला , त्यावेळी किंवा एखादी शत्रक्रीया असेल , अशावेळी रक्ताची गरज भासते . अशावेळी अचानकपणे रक्त मिळणे सहज शक्य नसते .
यासाठी आधीच नियोजन हवे .त्यासाठी रक्तदान केलेच पाहीजे .जेणेकरुन ते रक्तपेढीमध्ये योग्य प्रक्रीया करुन ठेवले जाते व आपणाला हवे त्यावेळी ते सहज उपलब्ध होते.अन्यथा रुग्ण दगावू शकतो .
म्हणूनच रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते .अनेक समाजसेवी संस्था यासाठी पुढाकार घेत असतात , अशावेळी त्यांना योग्य ते सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे .ही एक प्रकारची देशसेवाच आहे .
रक्तदान करुन देशसेवा व समाजसेवा करण्यास हातभार लावूया .
जयहींद .
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हिपूर ,416106 .
9881862530
mknagave21 @gmail.com
No comments:
Post a Comment