Sunday, 7 May 2017

संवाद

➖➖➖➖➖➖➖➖➖
📚 *काव्यप्रेमी शिक्षक मंच* 📚
  व   📚 *काव्यप्रेमी  परिवार*📚
➖➖➖➖➖➖➖➖➖
  ✍🏻 *झटपट प्रश्नोत्तरे* ✍🏻
➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *रविवार*
            *दि.२३/०४/२०१७*
      ➖➖➖➖

*एकच मुक्तोत्तरी प्रश्न*🙏🏻
--------------__----------------------------------
*मुक्तोत्तरी प्रश्न* -👇
🌹
  *संवाद तयार करणे*🤗

*शिक्षणासाठी बोर्डिंग मध्ये राहणारा मुलगा*
               आणि
*आपल्याच घरी आईबाबांजवळ राहून शिक्षण घेणारा मुलगा*
➖➖➖➖
मुलांच्या भावविश्वास अनुसरून 10-12 वाक्यांत संवाद तयार करणे.

सूरज -- हाय आकाश कसा              आहेस ?

आकाश -- एकदम मस्त रे ,तू कसा आहेस ?

सूरज -- सुट्टी लागली ना ?आता काय नियोजन ?

आकाश -- आईबाबांच्या सहवासात जेवढा वेळ घालवता येईल तेवढा घालवणार बघ.

सूरज -- हे रे काय ? चल ना बाहेर जाऊ .

आकाश -- नको सूरज , खुप तरसतोय रे मी आईवडीलांच्या प्रेमाला .खुप आठवण येते रे मला त्यांची.

सूरज -- अरे , ते तर घरी असतातच की .

आकाश -- अरे ते तुझ्यासाठी झालं . तू नेहमीच त्यांच्या जवळ असतोस . तुला नाही कळणार ते .

सूरज -- तस नाही आकाश मलाही हवे असतात आईबाबा.

आकाश -- पण तुला माझ्याएवढी तिव्रता नाही वाटणार.

सूरज -- माझी सगळी कामे त्यांच्याशिवाय होतच नाही बघ
आकाश -- माझा नाईलाज असतो ,पण मी सगळी माझी कामे स्वतःच करतो वदुस-यांनाही मदत करतो .पण आता सवय झालीय .काय वाटत नाही त्याचं .घरी मी आईलापण मदत करतो ना तेंव्हा तीला खुप बरे वाटते .

सूरज -- हो तेही खरचं , मीही आता आईला , वडीलांना मदत करणार .

आकाश -- हो का ? छान .चला पुन्हा भेटु .बाय.

सूरज -- बाय आकाश .आज तू एक चांगला धडा दिलास .धन्यवाद .

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि . कोल्हापूर

No comments:

Post a Comment