स्पर्धेसाठी
विद्रोही कविता
नराधम
कोण म्हणत आम्ही,
आहोत सुरक्षित ?
माझ्याच दारात आता ,
झाले मी असुरक्षित .
वयाचही भान नाही ,
या वासनांध नजरेला .
अंत ना ऊरला आता ,
या पाशवीपनाला .
असता जिवंत आता ,
शिवबा तो आमचा .
झाला असता चौरंगा ,
त्या नराधमांचा .
आदर्श आसती माझे ,
सावित्री , कल्पना अन् जिजाऊ .
अत्याचाराचा जाब विचारण्या ,
सांगा कोठे मी जाऊ ?
बदलून टाकू आता ,
पोकळ समाजव्यवस्था .
ऊघड तुझे लोचन ,
हे न्यायदेवता .
✍ कवियित्री✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर ,416106 .
No comments:
Post a Comment