आजचा उपक्रम
झटपट प्रश्नांची ऊत्तरे
विषय -- संस्कार
संस्कार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे संस्कारमोतींनी भरलेले ,महान स्त्रोत असलेले संस्काराचा महामेरु " शामची आई " हे परमपूज्य साने गुरुजींनी लिहलेले महन्मंगल पुस्तक होय .
आजच्या धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांच्या बरोबर पालकांचीही ससेहोलपट व धावपळ होत आहे .यामध्ये मुलांचे बालपण हरवत चाललय .त्यामध्ये संस्काराला कुठे जागा दिसत नाही .
संस्कार म्हणजे तर नेमके काय आहे ?गुणांचा गुणाकार करुन दोषांचा भागाकार करणे होय .पुर्वी गुरुकुल पद्धती मुळे शिष्यांना सर्व ज्ञान प्रत्यक्ष मिळत असे .ज्याचा उपयोग त्यांना त्यांच्या भावी आयुष्यात उपयोगी पडायचे .पण आज एकदोन लाडकी मुले , आजी-आजोबांची हकालपट्टी या कारणांमुळे संस्कार शिकवायची गोष्ट होऊन गेली आहे.संस्कारवर्ग ऊघडली गेली आहेत.
पण संस्कार हे कधीही शिकवायला लागत नसतात .ते आपोआपच घडत आसतात .मुले ही अनुकरणप्रिय असतात .त्यांना संस्कार आपल्या वागण्यातून द्यायचे असतात .आपण कसे वागतो तसे ते वागत असतात .याचे भान मोठ्यांनी व पालकांनी ,शिक्षकांनीही लक्षात ठेवले पाहीजे .संस्कार कधीही विकत घेता येत नाहीत .
त्यामुळे स्वयंशिस्त श्रमप्रतिष्ठा , स्वावलंबन याकडे लक्ष द्या व तसे वागा .तुमच्याकडे बघुन कुणीतरी वागतय ,आचरणात आणतय , याचे भान ठेवा.
✍✍ विचार ✍✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment