स्पर्धेसाठी
काव्यांजली
विषय -- सबलीकरण
होतीस सबला
गार्गी , मैत्रेयी ,लोपामुद्रा
होतीस भद्रा
पुरातनकाळी
माता जिजाऊ
झाशीची राणी अहील्या
चरणी वाहील्या
स्तुतीसुमने
माता सावित्री
इंदिरा , किरण ,सिंधुताई
प्रेरणास्थान बाई
स्त्रीजातीच्या
पावलावर पाऊल
ठेऊनी सबलीकरण करु
कास धरु
स्त्रीशक्तीची
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment