Sunday, 28 May 2017

अशी मी

अशी मी

   लाडाची लेक मी बाई
  सर्वांची आवडती आहे मी
  दोन भावात एकुलती एक
  आईबाबांची लाडकी मी

  लहानपणीची आहे मनु
  मैत्रीणींची मी अजुन मन्या
  शिक्षणासाठी फीरली गावे
  नोकरी आहे गावीच जुन्या

  विद्यार्थीप्रिय आज झाले
  समाधान ते दुजे काय असे
  पुरस्कार याहुनी काय हवा
  हृदयी सर्वांच्याच मी वसे

  गोजीरवाणी दोन मुले
  पूर्णत्वाची खुण भारी
  शिकुन झाली शहाणी
  घेतील उंचच भरारी

   अशी मी अशी मी
   खुश माझ्या जीवनी
   नको आता दुःख देवा
   सुखच माझ्या अंगनी

  ✍ रचना ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ
जि. कोल्हापूर ,416106

No comments:

Post a Comment