Sunday, 7 May 2017

टोपीतलं सौंदर्य

🙏🏻स्पर्धेसाठी 🙏

    चित्रावरुन कविता

    👩🏻‍✈  टोपीतलं सौंदर्य  👩🏻‍✈

  कौतुक तुझ पोरी ,
माझ्याशिवाय कोण करणार ?
  भविष्यातील अधिकारी ,
  तुझ्यातच मी पाहणार .

  फाटक्या माझ्या संसारात ,
  दिप आहेस तुच आशेचा .
  हास्य तुझ्या वदनावरचे ,
  साक्षिदार आपल्या प्रीतीचा .

  विसरुन गेले दुःख माझ ,
  साज-या या तुझ्या रुपानं .
  टोपीमधल सौंदर्य तुझ ,
  असच राख तू बेतानं .

  हातात तांब्या तसाच राहीला ,
  विसरुन गेले तोंड धुणे .
  नको देवा नशिबी पोरीच्या ,
  देऊ आमच्यासारखे जिणे .

  गोड निरागस रुप लेकीचं ,
  डोळ्यात भविष्याची झाक .
  ऐकशील ना नक्की बाई ,
  वेड्या आईची ही हाक .

✍✍ कवियीत्री ✍✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .416106

No comments:

Post a Comment