स्पर्धेसाठी
ओंजळ प्रेमाची
जातीचे झुगारुन बंधन ,
पाणी पाजतो तुला माते .
ओंजळ माझी प्रेमाची ,
तहान तुझी भागुन जाते .
झाली कासावीस उन्हानं ,
पानी शोधता मिळेना .
मानव नाही,तू जवळ आली,
प्रेम आपले जगा कळेना .
गरज तुला पाण्याची ,
रस्त्याने चालले सांडून .
म्हणूनच धरली ओंजळ ,
दमलेत सगळे आता भांडून.
जातीचा मुलामा खोटा ,
नको कुणी पांघरायला .
भूतदया दाखवताना जगी ,
हवी माणुसकी सांधायला .
✍ कवियीत्री ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर ,416106 .
No comments:
Post a Comment