✍ स्पर्धेसाठी ✍
🌻 चित्रकाव्य 🌻
संसार स्वप्न
मोहरीच शेत सखे ,
बघ कस मोहरलय .
पण चेह-यावर तुझ्या ,
कागं कोमेजलेपन दिसतय
घर आपलं कौलारु ,
आहे मातीनं शिंपलेल .
असलं जरी साधं तरी ,
आहे हिरवाईने नटलेलं .
पिवळ्याशार फुलांचा ,
मोह पडतोय जीवाला .
पर्वा नाही मला आता ,
फाटकं कापड अंगाला .
घेऊ विश्रांती घडीभर ,
लागू कामाला नेटानं .
सुंदर स्वप्न संसाराचं ,
सत्यात उतरवू बेतानं .
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
✍✍ रचना ✍✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106 .
No comments:
Post a Comment