स्पर्धेसाठी
सहनशीलता
अन्यायाचाही असतो अंत
जेव्हा संपते सहनशिलता
भले भले सहज हरतात
हवी फक्त कृतीशीलता
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि.कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
सहनशीलता
अन्यायाचाही असतो अंत
जेव्हा संपते सहनशिलता
भले भले सहज हरतात
हवी फक्त कृतीशीलता
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि.कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
विषय -- कल्पकता
मनाच्या सुप्त गाभा-यातून
फुलत जाते अशी कल्पकता
शब्दसुमनांच्या सुगंधाने
मोहरुन जाते जशी कविता
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
गजरा
आधुनीकतेचा बाज लेऊनी
सखे माळतो मी तुला गजरा
पाहुनी तुझा चेहरा हसरा
रोमांचीत दोघांसह गजरा
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
लढा
समतेचा लढा विषमतेशी
हयात थोर नेत्यांची गेली
कीती दिवस हे चालायच ?
प्रश्ने अनुत्तरीतच राहीलेली
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
चारोळी स्पर्धा
मधुगंध
मधुगंध तुझ्या आयुष्याचा
दरवळतोय आज चोहीकडे वाढावी किर्ती तुमची अशीच
हेच मागणे मागते ईश्वराकडे
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
विषय - वसंत बहरला
शिशीराचे राज्य संपले ,
दिसे पानगळीची अवकळा . ग्रीष्म आला पाठीमागून ,
वसंत बहरला गेली कळा .
वसंताच्या आगमनाने ,
फुलली , सजली धरणीमाता
चराचरात जागवली त्याने ,
नवजीवनाचे धुमारे आता .
आनंद भरला चोहीकडे ,
पालवी फुटली सगळीकडे .
गर्भरेशमी हीरवाईची जशी ,
शाल पांघरली धरतीवर .
मंजुळ गायन करी कोकीळा
आसमंत सारा भारावला .
उत्साहाचे बीज घेऊनी ,
यशकीर्तीकडे झेपावला .
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
🌨 पहिला पाऊस 🌨
झेलून अंगी पहिला पाऊस ,
रोम रोम सारे शहारले .
मानवाबरोबर धरतीचेही ,
कण न कण मोहरले .
पावसाच्या धारा झेलू ,
चिंब भिजूनी सर्व नाचू .
ओठांमध्ये पावसाची ,
असंख्य गीते आता रचू .
तरु , वेली , फुले , पाने ,
आससून पीऊ लागली .
तहान आर्त जीवांची ,
अशी आता भागू लागली .
प्राणी , पक्षी , निसर्ग आता ,
पाऊस पहिला झेलू लागली
तगमग ग्रीष्माची त्या आता ,
शितल , शांत होऊ लागली .
🌨🌨 रचना 🌨🌨
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
9881862530
अशी मी
लाडाची लेक मी बाई
सर्वांची आवडती आहे मी
दोन भावात एकुलती एक
आईबाबांची लाडकी मी
लहानपणीची आहे मनु
मैत्रीणींची मी अजुन मन्या
शिक्षणासाठी फीरली गावे
नोकरी आहे गावीच जुन्या
विद्यार्थीप्रिय आज झाले
समाधान ते दुजे काय असे
पुरस्कार याहुनी काय हवा
हृदयी सर्वांच्याच मी वसे
गोजीरवाणी दोन मुले
पूर्णत्वाची खुण भारी
शिकुन झाली शहाणी
घेतील उंचच भरारी
अशी मी अशी मी
खुश माझ्या जीवनी
नको आता दुःख देवा
सुखच माझ्या अंगनी
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ
जि. कोल्हापूर ,416106
स्पर्धेसाठी
विश्वास
विश्वासाच्या बळावर
फुलते नात्यांची ही बाग
नीती, नेकी सुंदर फुले
नसावा कुठलाही डाग
संसाराच्या भाऊगर्दीत
विश्वास सुंदर ठीकाण
मिळे इथेच खरा विसावा
नको बेडगी स्वार्थी मकान
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
पर्यावरण व मानव
पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा परिसर .यामध्ये सर्व सजीव निर्जीव घटकांचा समावेश होतो .त्यामुळे मानव व पर्यावरण विलग होऊच शकत नाहीत .
पर्यावरणातील सर्व घटक व त्यांचे संरक्षण व संवर्धन हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे .आज सगळीकडेच पर्यावरणाचे प्रदुषण विविध प्रकारे होत आहे .पाणी ,ध्वनी,वायू ई.प्रकारचे प्रदुषण होताना दिसते.
पर्यावरणातील प्रदुषण परीणामी मानवाचे सर्व प्रकारे नुकसानच होय . त्यामुळे मानवाला स्वताः सुरक्षित रहायचे असेल तर त्याला आपल्या परीसराची काळजी घेतलीच पाहीजे .
चला तर मग पर्यावरणाच्या रक्षणासाठी सिद्ध होऊ या
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
सुखाचा संसार
सुखदुःखाच्या झुल्यावर
झुलत राहू सदा आनंदाने
आली संकटे लाख जरी
सुखाचा संसार करु नेटाने
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
चारोळी
विषय -- धुळपेरणी
झाली नांगरणी , मशागत
करतोय शेतकरी धुळपेरणी
वाट पाहतोय वरुणराजाची
करेल तो आता तृप्त धरणी
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
चित्रकाव्य
पेरणी
झाली नांगरणी, मशागत ,
पेरणीला मी झालो तयार .
घेऊन जोडी सर्जा-राजाची ,
जोडली एक चवड पाभर .
बांधुन झोळी कमरेला ,
पेरणी करतोय नेटानं .
एक चवडीची पाभर माझी ,
धान्य पेरतीय नेकीनं .
बैलं माझी शुभ्र-धवल ,
लाल शिंगे शोभे शिरावरी .
आधुनिक पोशाख अन् टोपी
शोभून दिसतोय अंगावरी .
निरभ्र आकाश वरती छान ,
हिरवी धरती सजली खाली.
आवरु आता कामे आपली,
वेळ पावसाची ती आली .
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
विषय -- प्रतिभा
काव्यसुमने उधळीत आली
प्रतिभेच्या आज प्रांगणी
भावसुगंधाच्या लहरीवरती शोभूदे प्रतिभेच्या कोंदणी
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
चारोळी
शब्दराणी / काव्यकन्या
फुलत राहो सदा शब्दराणी
काव्यकन्या अशी बहरावी
जीवनात या अशी फुलावी
आशीषझुल्यावर ती झुलावी
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर, 416106
स्पर्धेसाठी
चारोळी
वृद्धाश्रमातील व्यथा
स्वार्थापोटी तयार झाल्या
शापीत वृद्धाश्रमातील व्यथा
काळजाला हो पडतात चरे
ऐकुन निरपराध्यांच्या कथा
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.416106
स्पर्धेसाठी
चारोळी
विषय -- नम्रता
नम्रता सद्गुणांचा कळस
हमखास खात्री देई यशाची
हृदयी स्थान मिळे सर्वांच्या
आपुलकीत भिती कशाची
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
अंगात चोळी,दंडात वाकी
हातात कोयता शोभतो खरा
गळामाळा,नजर लक्ष्यावर
समजेल हे तोच गडी खरा
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ,
जि.कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
चारोळी
विषय -- कौतुक
कौतुक मुलांचे सुखी करते
नेहमीच आई अन् बाबास
थाप हवी कौतुकाची सदा
जीवनात यशस्वी होण्यास
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर, 416106
पाऊसधारा
पावसाच्या धारा आल्या ,
प्रतिक्षा आता संपली .
गार तुषार अंगी स्पर्शिता ,
रोमांचीत काया झाली .
शांत वेली , शांत झाडे ,
निसर्ग अवघा शांत झाला .
पावसाच्या धारामध्ये ,
जो तो नाचू-गाऊ लागला .
आहे हवा अजून पाऊस ,
नको आता रुसुन बसू .
आनंदाच्या या क्षणी दे ,
सकलांच्या वदनी तू हसू .
वृक्ष लावू सगळीकडेच ,
तुझ्या स्वागताची तयारी .
पाहुनी वृक्ष सगळीकडे ,
नाचतील आनंदात सारी .
✍ कवियीत्री ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
भ्रष्टाचार म्हणजे नको असलेले , नैतिकतेला धरुन नसलेले वर्तन होय .मग ते क्षेत्र कोणतेही असो .आज असे एकही क्षेत्र असे राहीले नाही की जिथे भ्रष्टाचार नाही .हे थांबायला , थांबवायला तर हवेच . त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचा स्वार्थ बाजुला ठेउन याविरुद्ध आवाज उठवला पाहीजे .मी स्वताः भ्रष्टाचार करणार नाही व कुणाला करु देणार नाही हा निग्रह हवा
स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
ऊगवतीच्या साक्षिने खग
विहरण्या सज्ज झाले
सुर्यकीरणे सोनेरी पिवळी
हिरवाईत हे घरटे सजले
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
रविवार विशेष चारोळी काव्यस्पर्धा
विषय -- उत्साह
उत्साहाचे भरते येता मनी
सबब ती मग मागे पडते
कार्यतत्पर होण्यासाठी
जिद्दच मग कामी येते
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
विषय -- शाळा प्रवेश आणि पालकांची अवस्था
शाळा म्हटले की विद्यार्थी , पालक , शिक्षक व शिक्षण ओघानेच येते . आज आपण सर्वत्र पाहतो शाळांचे पेव फुटले आहे . जो तो शाळा सुरु करत आहे . एकाच गावात अनेक शाळा सुरु होत आहेत .
शाळा सुरु करणारे गावातीलच पुढारी असतात. पैशाच्या जोरावर ते सुरु करतात , पण तिथे प्रवेश घेण्यासाठी संबंधित लोकांना वेठीस धरले जाते. मराठी माध्यमाच्या शाळा शेजारीच असतात पण छानछौकीपणामुळे पालक या शाळांकडे ओढला जातो सुरवातीला बरे वाटते पण नंतर वास्तवता लक्षात येते.
काहींना याची कल्पना नसते.मुल जन्माला आले की पालकांना त्याच्या शाळेच्या चिंतेने ग्रासले जाते पैसा असणारे सहज प्रवेश मिळवू शकतात . पण काहीजणांची स्वःताची व मुलाची बौध्दिक क्षमता नसतानादेखील अशा महागड्या शाळेत प्रवेश घेतात व नंतर मग ईकडे आड अन तिकडे विहीर अशी अवस्था होते .
मागील वर्षाचा निकाल आजून लागत नाही तोपर्यंत शाळाप्रवेशासाठी विविध शाळांतील शिक्षक घरी यायला सुरवात होते.अशावेळीही पालक संभ्रमात पडतो.हे चित्र आहे ग्रामीण भागातले.
शहरी भागात चित्र वेगळे असते. तिथे शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्याबरोबर पालकांचीही परीक्षा घेतली जाते. अशावेळी पालक तणावपूर्ण वातावरणात असतो . काहीवेळा तर प्रतिष्ठेचा प्रश्न उद्भवतो .
हे सर्व अती होतय.हे कुठेतरी थांबायला हवे . पूर्विसारखी आनंददायी शिक्षणपध्दती आली पाहीजे.आता पालकांनी जागरुक होउन , नीट विचार करुन, कुठल्याही अमिषाला बळी न पडता . आपली व मुलाची पात्रता बघून योग्य शाळेत प्रवेश घेतला पाहीजे .
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
नोकरदार स्त्री
सकाळी लवकर उठावे लागते
स्वतःबरोबर सगळ्यांच आवरते
मन मारुन जगावे लागते
कारण पैसा मी कमावते
खर्चाला बसतो आळा गं
गृहिणी
सकाळी उठते मीही लवकर आवरुन विश्रांती मग मी घेते
नवरा माझा कमावता गं
हवा तसा पैसा मला मिळतो
मग का हात मी आवरु गं
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता .शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
समानता
जो तो ओरडून सांगतो
समानतेच्या बाष्कळ गप्पा
वेळ येते आचरणाची
ठरतात मग निव्वळ थापा
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर
स्पर्धेसाठी
ओंजळ प्रेमाची
जातीचे झुगारुन बंधन ,
पाणी पाजतो तुला माते .
ओंजळ माझी प्रेमाची ,
तहान तुझी भागुन जाते .
झाली कासावीस उन्हानं ,
पानी शोधता मिळेना .
मानव नाही,तू जवळ आली,
प्रेम आपले जगा कळेना .
गरज तुला पाण्याची ,
रस्त्याने चालले सांडून .
म्हणूनच धरली ओंजळ ,
दमलेत सगळे आता भांडून.
जातीचा मुलामा खोटा ,
नको कुणी पांघरायला .
भूतदया दाखवताना जगी ,
हवी माणुसकी सांधायला .
✍ कवियीत्री ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर ,416106 .
स्पर्धेसाठी
अनाथांचे जीवन
नाथ नाही ज्यांच्या जीवनी
पामरांचे जीणे त्यांच्या माथी
उपकाराच्या ओझ्याखाली
पारतंत्र्याचेच जीणे साथी
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106
हम है काव्यप्रेमी
हम है सब काव्यप्रेमी
काव्य हमारा काम
बिना काव्य के कभी
नही करते हम आराम
भावना मन की शब्दों में
उतर आती है कलमसे
शब्दसागर बनता है
तैरते है हम मनसे
कभी यहाँ तो कभी वहाँ
नही है एक ठिकाणा
जो जचता है मनको
लगता है उसपर निशाणा
सही भाव को प्रकटना
है नही उतना आसान
कल्पनाशक्ती से अपने
भरते है हम उँची ऊडान
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता . शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
विषय - बालमजुरी थांबलीच पाहीजे
राबण्यात बाल्य हरविले
निरागस कोमल करांनी
बालमजुरी थांबलीच पाहीजे
न्हावु घालू शिक्षणधारांनी
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर ,416106
स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
निळे अंबर नी निळे जल
कोसळती जलधारा खास
हिरवाईच्या डोंगरामध्ये
भारतभूमी दिसते आम्हास
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर ,416106
स्पर्धेसाठी
वात्रटिका
कायदेच कायदे सगळीकडे
कुठला कुणाला नकळे
कागदच झाले खुप आता
भरले की झाले सर्व मोकळे
कार्यवाही हवी फक्त आम्हा
निकालात नीघाला कायदा
पळवाटाच झाल्या भरपूर
धुळीला मिळाला वायदा
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि. कोल्हापूर ,416106
प्रीतीचा झरा
सुकलेला प्रीतीचा झरा ,
शब्दांनी फुलला खरा .
स्वप्नांना फुटले धुमारे ,
ध्यास तुझाच लागला रे .
भूत भविष्याचा वेध घेता ,
वर्तमानात लागला शोध .
झोका विचारांचा लागला झुलू,
प्रितीचा गंध लागला खुलू .
सौंदर्याची साथ असुनही ,
शब्दांमृतांची आस अजुनही
हरवलेल्या स्वप्नांना जिद्दीचे बळ ,
पूर्ण होण्या त्यांची चालते खळबळ .
ॲपसाठी
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
mknagave21 @gmail .com
9881862530
15 / 05 /2017
स्पर्धेसाठी
विषय -- आई
प्राणप्रिय आई
सर्वांचीच आश्वासक छाया
निस्वार्थी माया
वर्षावते
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
कर्तव्यदक्ष
कर्तव्यदक्ष आई बाबा
ऊतराई व्हावी न कधी
आयुष्याच्या संध्याकाळी
काळजी घ्या सर्वात आधी
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
पहीला पाऊस
अंग अंग मोहरुन गेले
पाऊस पहीला झेलून
भिजव असाच धरतीला
घेईल तूला ती तोलून
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
काव्यांजली
विषय -- सबलीकरण
होतीस सबला
गार्गी , मैत्रेयी ,लोपामुद्रा
होतीस भद्रा
पुरातनकाळी
माता जिजाऊ
झाशीची राणी अहील्या
चरणी वाहील्या
स्तुतीसुमने
माता सावित्री
इंदिरा , किरण ,सिंधुताई
प्रेरणास्थान बाई
स्त्रीजातीच्या
पावलावर पाऊल
ठेऊनी सबलीकरण करु
कास धरु
स्त्रीशक्तीची
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
चारोळी
जीवन एक संघर्ष आहे
रोज नवे आव्हान आहे
संघर्षातून यशाकडे जाणे
हाच खरा मानवधर्म आहे
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
विषय -- मुक्त खुली कविता स्पर्धा
कसरत पाण्यासाठी
रविराज तो तापला ,
झाली काहीली जीवाची .
वृक्षतोड केली आम्ही ,
भोगतोय सजा त्याची .
माणसाबरोबर धरतीही ,
शोधतेय आता पाणी .
सहन करतात चटका मुले ,
पाय त्यांचे अनवाणी .
घोटभर पाण्यासाठी ,
फीरतोय मी वणवण .
एक थेंब पाण्याचा ,
देतोय दुष्काळाची आठवण
बापलेकांची चाले आता ,
पाण्यासाठी कसरत .
नाश नको पर्यावरणाचा ,
चाललोय आपण विसरत .
भागवा रे तहान ,
या दोन थेंबावरती .
हिरवाईचे रक्षण करु ,
जबाबदारी घेऊ खांद्यावरती
✍ कवियीत्री ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर ,416106
mknagave21 @gmail.com
स्पर्धेसाठी
चित्रचारोळी
गारवा पाण्याचा पायाला
फुलले हास्य वदनावरती
पाहुन प्रतिबिंब साजरे
निरागस बाल्य झुल्यावरती
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
स्पर्धेसाठी
विद्रोही कविता
नराधम
कोण म्हणत आम्ही,
आहोत सुरक्षित ?
माझ्याच दारात आता ,
झाले मी असुरक्षित .
वयाचही भान नाही ,
या वासनांध नजरेला .
अंत ना ऊरला आता ,
या पाशवीपनाला .
असता जिवंत आता ,
शिवबा तो आमचा .
झाला असता चौरंगा ,
त्या नराधमांचा .
आदर्श आसती माझे ,
सावित्री , कल्पना अन् जिजाऊ .
अत्याचाराचा जाब विचारण्या ,
सांगा कोठे मी जाऊ ?
बदलून टाकू आता ,
पोकळ समाजव्यवस्था .
ऊघड तुझे लोचन ,
हे न्यायदेवता .
✍ कवियित्री✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर ,416106 .
आद्याक्षरावरुन कविता
माणिक कल्लाप्पा नागावे
*मा*मागे कधीही न सरता
*णि*नशिबातले स्विकारले
*क*कर्मबंधाच्या गाठी ऊसवत
*क*कल्पनेची जोड देत गेले .
*ल्ला*लाजवाब नशीब बनविण्यासाठी
*प्पा*पारदर्शकता दाखवत आले.
*ना*नाकर्तेपणा कधीही न दाखवता ,
*गा*गावकुसापासून दूर येऊन,
*वे*वेध जीवनाचा घेतला .
*कु*कुणापुढेही न नमता
*रुं*रुंद केल्या ज्ञानाच्या कक्षा.
*द*दम आहे जीवनात ,
*वा*वागेन सचोटीनेच .
*ड*डरकाळी यशाची ऐकली आहे .
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106 .
स्पर्धेसाठी
रक्तदान श्रेष्ठ दान
"आरोग्यम् धनसंपदा "असे
म्हटले जाते .शरीरस्वास्थ्य ठीक असेल तरच मानव आनंदी राहू शकतो . यासाठी त्याच्या शरीरातील सर्व घटक योग्य प्रमाणात असावे लागतात. तसेच रक्ताचे आहे .
रक्त शरीराला आवश्यक असणारा घटक आहे.याशिवाय शरीराला शून्य किंमत आहे .म्हणू याचे शरीरातील प्रमाण योग्यच हवे .जरा ते कमी झाले किंवा त्यातील एखादा घटक कमी झाला तर ते जीवावर बेतु शकते .
जर एखादा अपघात झाला , त्यावेळी किंवा एखादी शत्रक्रीया असेल , अशावेळी रक्ताची गरज भासते . अशावेळी अचानकपणे रक्त मिळणे सहज शक्य नसते .
यासाठी आधीच नियोजन हवे .त्यासाठी रक्तदान केलेच पाहीजे .जेणेकरुन ते रक्तपेढीमध्ये योग्य प्रक्रीया करुन ठेवले जाते व आपणाला हवे त्यावेळी ते सहज उपलब्ध होते.अन्यथा रुग्ण दगावू शकतो .
म्हणूनच रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते .अनेक समाजसेवी संस्था यासाठी पुढाकार घेत असतात , अशावेळी त्यांना योग्य ते सहकार्य करणे आपले कर्तव्य आहे .ही एक प्रकारची देशसेवाच आहे .
रक्तदान करुन देशसेवा व समाजसेवा करण्यास हातभार लावूया .
जयहींद .
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हिपूर ,416106 .
9881862530
mknagave21 @gmail.com
स्पर्धेसाठी
चारोळी
लक्ष्य ठेऊनी ध्येयावरती
निसर्गाशी एकरुप झालो
टिपन्या सहज शत्रुला
सर्व पाश मी तोडुन आलो
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106 .
आज पुन्हा।एक पुस्तक वाचायला मिळालं. समतेचे पुजारी एस .एम.जोशी.
यांच चरित्र नागावे मॅडमांनी खुप छान रेखाटले.मी दोन वेळा वाचल .
एस एम यांच नाव मी कधी एैकल नव्हत.या पुस्तकाने त्याच्या कार्याची अोळख मला करुन दिली .
राष्ट्र हितासाठी सतत धडपडणार व्यक्तिमत्व होत हे.
खुप घाव छेलुनही हसत मुखानेअनंतात विलीन होणारे एस .एम एक कुशल संघटक होते.
असामान्य व्यक्तिमत्व असुन स्वत:ला सामान्य म्हणारा एक थोर माणुस म्हणजे एस.एम.होय
खुप छान लिहिलत मॅडम.........
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐
स्पर्धेसाठी
चित्रकाव्य स्पर्धा
माझा सर्जा
झाली उन्हानं काहीली ,
तगमग जीवाची वाढली .
रस्ता झाला आता गरम,
लाही अंगाची हो झाली .
बैलगाडी माझी कामात ,
सर्जा तापतोय उन्हात .
पाहुन जीव कळवळे , गोणपाटाची छाया झोकात .
तूला मिळूदे सावली ,
माझा विचार नको करु .
मिळून आपण दोघ ,
मार्ग कष्टाचा आता धरु .
आधार तू माझा एकला ,
जपायलाच हव तूला .
कुटुंबाच्या माझ्या आता,
पोशिंदा तूच झालास .
चल जाऊ झोकात ,
काम करु झकास .
करुन अडचणींवर मात
सुंदर करु जीवन भकास
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता . शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
9881862530
स्पर्धेसाठी
विषय -- आवकाळी
अवकाळी पाऊस
झाला मारा गारांचा
गोंधळ सर्वांचा
झाला
पळापळ सगळीकडे
आसरा शोधतात सगळे
चित्रच वेगळे
दिसते
महीलांची लगबग
वाळवण घातलय उन्हात
काढायचय क्षणात
गडबडीने
जोरात वाहतोय
वारा आता बाई
करा घाई
लगबगीने
मिळाला आसरा
घरातच माझ्या आता
नाही आता
काळजी
✍ रचना ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
9881862530