Thursday, 30 May 2019

कविता ( जैन धर्म )

जैन धर्म

जैनधर्म सामासिक शब्द,
बनला जैन व धर्मापासून.
जैन उद्भवला जिनपासून,
अर्थात ज्याने आहे जिंकलेले.
कुणी जिंकावे कर्मास,
कुणी आत्मिक विकासास.
मिळवून सत्ता या सर्वांवर,
पंचेद्रियास मग जिंकावे.

गरज यांस श्रद्धा, चारित्र्याची,
सम्यकदर्शन, ज्ञान,  मिळवण्याची.....
स्विकारा अहिंसा मनापासून.
ठरले चोविसावे तिर्थंकर
भगवान महावीर या अहिंसेतूनच..
ठरवून शाकाहार श्रेष्ठ आहार,
थोर उपदेश दिला जनतेस.
अहिंसा परमो धर्म......
घोष दिला संदेश महान.
गरज जगी याआज जाणवते,
शाकाहाराची अन् अहिंसेचीसुद्धा..
धर्म आपला जिनांचा, त्यागाचा....
वाढवू आपल्या आचरणाने.
भविष्य आपले आपल्या हाती,
होऊन जागे धर्माला जाणा.
वाढवायचा विश्वात का घालवायचा?
भरतील संमेलने साहित्याची,
अन् कवितेचीसुद्धा.....
साहित्य आपले वाढवायचे ,
करु आत्मसात आपली मूल्ये
टाकू गाडून विकारी विचारांना,
करु प्रसार जिनधर्माचा.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment