*( स्री म्हणजे खेळणं नव्हे )
खेळत आईच्या मांडीवर बसूनी
वाढले मी लाडात राणी
लागले चालू दुडुदुडु अंगणी
तेव्हा होते मी खेळखेळणी माझ्याच आईबाबांच्या मनी...
टाकले पाऊल समाजात सहजच
दिसत होते बाहुलीगोजिरी छानच
वाटलं नव्हतं खरंच खेळणं बनेन
शंका मनातली सत्यात उतरेन
संताप लकेर मस्तकात धुमसेन
सांगावे वाटे ओरडून जगाला
अरे!!स्त्री ही खेळणं नव्हे उशाला
आहेत भावना अन मनही तिला
सुंदर हळवी मनस्वी पण सबला
विचार करा रे त्याचा तुम्ही सानुला
बंद करा वासनांध नजरघाला !
नाही व्हायचं मला खेळणं कुणाचं
प्रतिकार करायलाच शिकायचं
अकारण त्या अन्यायाविरुदधच
मिळणाऱ्या वागणुकीविरुद्धच
मला आता बंडखोर बनायचं
उद्धारण्या नारी आता लढायचं
पाडण्या मुडदे अत्याचाऱ्यांचं
जागे व्हा षंढानो,माझ्याशी सामना वारसा आमचा झाँसीचा, वीरांगना
पराक्रमी अहिल्येचा जिजाऊंचा
सावित्री दुर्गेच्या अखंड त्यागाचा पेटून उठली तर घोट घेई नरडीचा
स्त्री म्हणजे खेळणे नव्हे !तू जाग !
भडकली तर धगधगती रे आग !
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment