Wednesday, 29 May 2019

कविता ( शांतिसागर महाराज )

कविता

शांतिसागर महाराज

शतक विसावे धन्य झाले,
शांतिसागर जन्मा आले.
भिमगोंड अन् सत्यवती ,
कृतार्थ होऊन गाऊ लागले.

बाळ सातगोंडा तेज:पुंज ,
पाहताच हर्षित सारेजण.
भविष्यवाणी ज्योतिषांची,
बणनार बालक पुढे महान.

धार्मिकतेचा वसा घेऊन,
निर्मोही मन बनत गेले.
ध्यास लागला मुनीजनांचा,
परोपकारी जीवन बनले.

मुनीदिक्षा दिली देवेंन्द्रकीर्तींनी
बनले महाराज शांतिसागर .
उपदेशाने जागृत केला,
अंध:कारातील जनसागर.

संघ बनविला स्वकर्तृत्वाने,
आचार्यपद बहाल झाले.
चारित्र्य चक्रवर्ती बनले जगी,
सर्वधर्मसमभावाचे पाईक बनले.

त्यागभावना कामी आली,
सल्लेखनाव्रत कुंथलगिरीवर.
अंतिम उपदेश करुन मानवा,
देह ठेवला या धरतीवर.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment