स्पर्धेसाठी
अष्टाक्षरी
विषय-- दुष्काळ
वृक्षतोड खूप झाली,
ओस पडे वनराई .
शुष्क धरणी बोलली,
नका करु नष्ट आई.
केली झाडे लुप्त आता,
परागंदा प्राणवायू .
कासावीस प्राणपक्षी,
जसा तडपे जटायू.
माळरान भणाणले,
ओसाडले पाण्याविना .
खाली पातळी पाण्याची,
वाटीभर सापडेना.
जनावरे गोठ्यामधे,
ओरडती तृषार्तून.
पाहवेना मालकाला,
तडफड मनातून.
गाठलाय विहीरीने,
तळ केव्हाच जगती.
साहवेना कुणालाही,
हवी व्हावी जलतृप्ती.
दारोदारी हा दुष्काळ,
सतावतो सानथोरा.
पाहुनिया दैन्यावस्था,
जीव कापे चरचरा.
जपणूक करण्यास,
वाचवण्या मातृभूमी.
कटिबद्ध राहू सारे,
जागरुक तुम्ही आम्ही.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment