स्पर्धेसाठी
चित्रकाव्य
आधार
भकास नजरेने पाहताना,
बघून तुम्हाला शेतीकडे.
काळजात माझ्या चर्र होते,
बाबा पहा तुम्ही माझ्याकडे.
तुम्ही दिला आधार मला,
आता मी आधार तुमचा.
गाठी मारुन बंडीला या ,
झाकते मी संसार गरीबीचा.
शिवार मोकळे दिसते,
वृक्ष उभा सावलीला.
पाईपलाईन जरी टाकली,
शोधते ती पाण्याला.
मुंडासे बांधून डोक्याला,
आधार आहे काठीचा.
लेक लाडकी सांधत असते,
फाटका सदरा बापाचा.
आशावादी रहावे नेहमी,
काम करावे नेटकेपणाने.
सामोरे जाऊ संकटांना,
लढू जोमात प्राणपणाने.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment