Thursday, 23 May 2019

षढाक्षरी ( वाट मी पाहते )

स्पर्धेसाठी

षढाक्षरी

विषय - वाट मी पाहते

प्रेम वात्सल्याची,
वाट मी पाहते.
जगी आज साऱ्या,
अशांती नांदते.

गरज आहेच,
माणुसकीचीच.
खच पडलाय,
दानवतेचाच.

वासना,विकृती,
उघड होतात.
पदोपदी जगी,
क्रूर हसतात.

भ्रष्टाचार येथे,
भयाण भासतो.
अन्याय रोजच,
सहज वाढतो.

सुंदर असावा,
चैतन्य वाढावे.
इच्छा मनी खास,
जग सुखी व्हावे.

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment