कविता
वेळेचे महत्त्व
थांबत नाही काळ इथे ,
नाही मिळणार परत वेळ.
जाणून वेळेचे महत्त्व मानवा,
घाल तू सगळा ताळमेळ.
गेला समय जातच राहणार,
नाही कधीच मागे फिरणार.
घड्याळ नाही फक्त शोभेला,
ते योग्य वेळच दाखवणार.
जरी धरले हाती समयदर्शकाला,
नाही धरु शकणार गत समयाला.
वाऱ्यासारखा,वाऱ्याप्रमाणे,
वेळ भेटतोय भविष्याला.
नियम हा निसर्गाचा अभंग,
नाही उपयोगाची उत्क्रांती.
गजबजलेल्या या जगात,
शोधणार तू फक्त शांती.
काम यंत्राचे प्रामाणिक,
ना भुलणार प्रलोभनाला.
विवेकबुद्धी ठेवून गहाण मानवाने,
विकलयं प्रामाणिकपणाला.
थांब विचार कर थोडा ,
बदलायचे आहे तुला व्यक्तीत्व.
पाहून घड्याळातील काटे ,
सावर तुझे हरवणारे अस्तित्व.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment