शब्दगुंफण स्पर्धेसाठी
हायकू
धरती माता
धरती माता
आसुसली बीजाला
येण्या कोंबाला
पेरणी झाली
गर्भ तो आकारला
असा जन्मला
शालू हिरवा
धरणीने नेसला
संतोष झाला
धान्य डुलले
रास रानी पडली
मने फुलली
हर्ष जीवाला
पाहून खळ्यावर
मना आवर
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment