Thursday, 23 May 2019

कविता ( प्रलोभन )

प्रलोभन

प्रलोभनांच्या मागे लागून ,

मानवा, तू का असा पळशी.

समजून कधी घेणार गड्या,

कमालीचा तू रे आळशी.

कर्म तुझे हे तुलाच भोवते,

खड्ड्यात अकार्यक्षमतेच्या.

खणून ठेवला तुझ्या हाताने,

काठावर निष्क्रीयतेच्या .

जाण ,संकटा समोर आहे,

नजर त्यावर पडू दे जरा.

वैचारिक जाणिवांच्या पातळीने,

ठरवं,कोण खोटा अन् कोण खरा.

वापर सुशिक्षितपणाचा करुन,

विवेकबुद्धी जागृत ठेव .

नाही भेटणार कधीच तुला,

खऱ्या वाटणाऱ्या या पैशात देव.

जाण तू परीस्थितीला मानवा,

सत्कारणी लाव तुझे हे जीवन

करुन वापर तुझ्या बुद्धीचा,

कर जीवनाचे नंदनवन.

कवयित्री

श्रीमती माणिक नागावे

कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment