Monday, 6 May 2019

कविता ( तहानलेला कावळा )

स्पर्धेसाठी

चित्रकविता

भरारी प्रिमीयम लीग

कविता

तहानलेला कावळा

ताप सूर्यदेवाचा कोपला,
तगमग जीवाची या झाली.
मानव असो वा असो पक्षी,
वणवण पदरी सर्वांच्या आली

माठ पाहून पाण्याचा,
तहानलेला कावळा झेपावला
नसे थेंबही तळाशी माठाच्या,
दु:खीकष्टी मनोमन झाला.

युक्ति पारंपारिक आठवत,
गोळा केले दगडगोटे लहान.
जरी भरला माठ काठोकाठ,
केला विद्रोह थेंबभर जलाने.

कोरड घशाला पडली,
आस जलाची वाढली.
जीव वेडापिसा होऊन,
काया कावळ्याची थंडावली.

हाक निसर्गाने दिली आज,
वृक्षारोपणाची जलसंवर्धनाची
सुखद भविष्य करण्याची,
आली वेळ मानवाची.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment