Wednesday, 29 May 2019

कविता ( जिनवाणी )

                  जिनवाणी

धर्मतीर्थाची केली स्थापना,
ऋषभनाथ भगवंतांनी.
परंपरा ही श्रुतज्ञानाची,
चालविली महावीरांनी.

श्रुतस्कंधाला म्हणती सारे,
द्वादशवाणी जिनवानी.
पुजती ज्येष्ठ शुद्ध पंचमीला,
आगम प्रेमी विधी विधानांनी.

  प्रचलित नाव श्रूतपंचमी,
ज्ञात श्रूतवरांचा इतिहास.
जीन उत्पत्ती जीत पासून,
जिंकले ज्याने  कषायास.

वीतरागी मानव ठरला,
जिंकून मनोविकारांना.
अरिहंत म्हणती त्याला,
परास्त केले घातीयांना.

केवलज्ञान प्राप्त झाली,
कठोर तपश्चर्येणे.
  निर्दोष त्यांची वाणी ठरते,
युगपत जाण्याच्या क्षमतेने.

दिव्य ध्वनि ही महान ठरली,
संबोधली महावीर वाणीने.
रत्नत्रय हा महान धर्म,
आचरुण सम्यक, श्रद्धा, ज्ञानाने.

संबोधती तया जैन विद्या,
जया अंगी जैन तत्वज्ञान शैली.
गरज आजच्या काळाची,
जिनवाणी हरमुखी आली.

कवयित्री
  श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment