वीरपुत्र
वीरपुत्र भारतमातेचे शूर,
चारलेत तुम्ही शत्रूला खडे.
देऊन प्राणांची आहुती,
वाजविले विजयी चौघडे.
पाठवले यमसदनी गनिमा,
होऊन उदार प्राणांवरती.
सांडले रक्त मातृभूमीवरती,
अभिमानाने फुलली छाती.
देशरक्षणार्थ झिजली काया,
परकीयांना न थारा असे इथे.
इंइं इंच भूमीसाठी भिडले,
भयकंपीत परकीय झाले तिथे.
अफाट शौर्याची गाथा वदली,
शहीद झाल्यावर रणांगणी.
लपेटून तिरंग्यात परतला.
आई झाली वीरमाता त्या क्षणी.
दु:ख,अभिमानाची भावना,
उसळू पाहते प्रकटण्या जगी.
व्यर्थन जावो बलिदान आपले,
ये परतूनी पुन्हा उदरी ,माता मागी.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment