Friday, 29 September 2017

प्रेम

स्पर्धेसाठी

       चित्रकाव्य

            प्रेम

प्रेमापुढे मुलाच्या बापाला ,
सारं जग दुय्यम असतं .
कौतुक लेकाच मोबाईलवर ,
बंदिस्त करु घेत असतं .

सायकलच गरीबाची सवारी,
त्यावर ऐटीत स्वार झाली.
सानुल्याची मूर्ती सुंदर ,
नयनात या कैद झाली .

फुटपाथच ठरला प्रेक्षणीय ,
पाहुन छबी छकुल्याची .
रस्त्यावरच काढतो फोटो ,
साक्ष बापाच्या प्रेमाची .

पर्यावरणरक्षणाची शिकवण
देते सवारी सायकलची .
भावी पिढीला पटवून देऊ ,
गरज इंधन बचतीची .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment