Tuesday, 5 September 2017

गुरुविण जगी नाही कोण थोर

काव्य स्पर्धेसाठी

गुरुविण जगी नाही कोण थोर

गुरुमहिमा गाऊ किती जगी
गुरुविण नाही कोण थोर .
तुझ्या कृपेने लाभे आम्हाला,
ज्ञानगंगेचे अमृत फार .

आयुष्यातील चढऊतार ,
आठवून तुला केले पार .
यशपताका उंचच नेली ,
लावला झेंडा अटकेपार.

ज्ञानसागरात पोहताना ,
हात दिला तुम्ही बुडताना.
आज समुद्र करतो पार ,
सहज तुम्हा आठवताना .

घेऊ उंच उडान आकाशी ,
वचन तुम्हा दिले मंदिरी .
प्रेरणादायक वचनाने ,
मारली सहज मी भरारी .

प्रणाम तुजला गुरुराया ,
वंदिन चरण मनोभावे .
जीवन माझे उजळले हे,
आशिष असेच हे मिळावे.

     कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment