स्पर्धेसाठी
चित्रकाव्य
नदी
दुथडी भरुन वाहते आहे ,
पात्राबाहेर पडू पाहते आहे.
पूर आला नदीला आता ,
पाऊस भरपूर पडला आहे.
शांत निरव वातावरणात ,
प्रभा आकाशीची डोकावते.
प्रतिबिंब आपले जणू ते ,
अलगद निरखून पाहते .
हिरवाईने काठ सजला ,
वनराई ही शोभून दिसते.
वाहत्या पाण्यात झाडांच्या,
मुळांनी पाय बुडविले असते
दोन प्रवाह पाण्याचे येथे ,
एकमेकांत मिसळू पाहतात.
रुप पाण्याचे पाहताना ,
दोन वेगळे प्रवाह दिसतात.
नदी देते संदेश वाहण्याचा,
सतत पुढेच जाण्याचा .
गेलेले ते विसरुन जाऊन,
विकास स्वतःचा करण्याचा.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
No comments:
Post a Comment