Sunday, 10 September 2017

कोण होतीस तू

स्पर्धेसाठी

   कोण होतीस तू

आदिमाया तू आदिशक्ती ,
सम्मान तूला या जगती.
जगनिर्माती तू असशी ,
गाते तुझीच मी महती.

जिजाऊ ,आहिल्या,सावित्री
कर्तृत्वाने पावन झाल्या .
हिरकणीच्या मातृत्वाने ,
माता पूजनीय झाल्या .

क्षेत्र नसे तिला परके कुठले,
आत्मविश्वासाने वावरते .
परंपरागत संस्कृतीचे बंध ,
तोडून जगी ती अशी धावते.

कोण होतीस ,काय झालीस
म्हणती तिजला जरी कोणी
ऊत्तर त्याचे ठोस असे मग,
मीच माझ्या मनाची राणी .

कधी अविचारी असंस्कृती ,
दिसता जगी कळवळते मन
ओरडून सांगू जगाला आता
जपा तुम्ही तन मन धन .

   कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment