स्पर्धेसाठी
तुच दुर्गा
चूल आणि मूल क्षेत्र ,
समजत आलाय समाज .
मातृसत्ताक पद्धत होती ,
प्राचीन काळी हवी ऊमज.
मातृशक्ती हीच आदिशक्ती ,
पूजनीय आहे तिची मूर्ती .
प्राणी पक्षी वाहन तिचे ,
वंदनिय तिची महान कीर्ती .
तूच दुर्गा तूच त्राता ,
सकलजनांची तूच माता.
दुष्टांची तू संहारक खरी,
पूजीते मनोभावे तूला आता.
अबला नाही सबला मी ,
पायावर उभी माझ्या मी.
दुर्गेचे आहे प्रतिक मी ,
राहीन सदैव पूजनिय मी .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
No comments:
Post a Comment