Saturday, 30 September 2017

दसरा

स्पर्धेसाठी

दसरा..सगळे प्रॉब्लेम विसरा

विजयाचा विजयोत्सव ,
साजरा करु चला .
दसरा सण मोठा ,
सोने लूटुया चला .

आनंदाने नाचू गाऊ ,
व्यवस्थित ठेऊ पसारा .
आरोग्य मग देईल साथ ,
दसरा..सगळे प्रॉब्लेम विसरा.

आपट्यांच्या पानाला आहे ,
हृदयासारखा आकार .
प्रेम जिव्हाळा मनातील ,
करुया चला साकार .

सोन्यासारखं मौल्यवान,
असावं आपल वर्तन .
आपोआप  भरभराट ,
करेल मग सुंदर नर्तन .

परस्पर सहकार्यवृत्ती ,
अंगी बाणवू चला .
दसरा सणामुळे आज ,
आनंद लूटुया चला .

     कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

No comments:

Post a Comment