Tuesday, 5 September 2017

बाप्पा ..... निघालात ?

स्पर्धेसाठी

बाप्पा ...... निघालात ?

बाप्पा ..... निघालात ?
कंटाळून ? की आनंदाने ?
जाऊन सांगा मातेला ,
स्वागत तुमचे केले कशाने ?

आलात वाजतगाजतच ,
स्थानापन्न सुंदर मखरात .
भक्तांच्या भक्तीने , पूजेने ,
झाले आगमन जोरात .

गाणी ऐकुन डीजेची ,
किटले असतील कान .
प्रबोधनाची ऐकवून गाणी ,
धरायला हवी होती तान .

सगळेच नाहीत दोषी याला,
समाजप्रवृत्ती बदलूया .
संकटमोचन तुम्हीच आता ,
अंजन लोचणी घालूया .

भक्तीपेक्षा स्पर्धा पाहून ,
मानसिकता हरवली असेल.
भावा पेक्षा मत्सरच जास्त ,
तुम्हाला ईथे दिसला असेल.

प्रेरणा काय घ्यावी यातून,
भावी पिढीने सांगा आता .
मार्ग काढा यातून काही ,
तुम्हीच आता आमचा त्राता.

    कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment