स्पर्धेसाठी
काव्यस्पर्धा
विद्रोही विचारांचा खून
किती घालता गोळ्या ?
किती पाडता खून ?
फीरली डोकी तुमची आता
घ्या मनं आता धुऊन .
विचाराला नाही मारु शकत
समजत नाही का तुम्हाला ?
विद्रोही विचारांचे खून करुन
दाखवताय काय जगाला ?
भानावर या वेड्यांनो ,
माणुसकी हृदयात ऊतरु दे.
हकनाक माणसे मारताना,
हात तुमचा थरथरु दे .
मनातल्या भावना आमच्या,
कधी मांडायच्याच नाहीत ?
लोकशाही की हूकुमशाही ?
मानवता आहे का माहीत ?
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment