Friday, 15 September 2017

रंगांची ऊधळण

स्पर्धेसाठी

          चित्रकाव्य

      रंगांची ऊधळण

सप्तरंगी रंगात न्हाला ,
मानव हा रंगीबेरंगी .
चालतो हा पुढेपुढे ,
टाकून मागे दुनिया बहुरंगी.

उधळण रंगांची करत जातो,
आसमंत  दरवळून टाकतो .
जरी जमली ही रंगसंगती ,
प्रेमरुपी हृदय जिंकून जातो.

हृदय असे हे लक्षवेधी ,
जिंकून जाते मानवाला .
यावरच अवलंबून आहे ,
गाडून टाकायचे दानवाला.

स्वतःबरोबर दुस-याचेही ,
जीवन रंगीन बनवाचय .
जरी आली दुःखे अनेक ,
त्यांना आनंदाने पचवायचय.

लक्ष ध्येयावर सतत ठेऊन,
आनंदाने आपण पुढेच धावू.
स्वतःबरोबर दुस-याच्याही ,
जीवनात प्रेमज्योत लावू.

   कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment