Sunday, 3 September 2017

सरस्वती माता

आजचा खास उपक्रम

चित्रावर बोलू काही

      सरस्वती माता

हे सरस्वती , विद्यादेवी ,
रुप तुझे हे छान सुंदर .
शुभ्र वसणे अंगावरती ,
शोभून दिसतात सुंदर .

कमलदलातील राजहंस हा ,
प्रगतीकडे भरे उडान तो.
हाती विणा ,वेद,माळ ही,
किरीट शीरी कीती शोभतो.

हिरवाईच्या पार्श्वभूमीवर ,
मोहक तुझी ही शोभे मुर्ती.
नमन आपसूक करी जनता,
ऐकुन तुझी थोर कीर्ती .

प्रेरणा तू ज्ञानार्जनाची ,
बालके करती विद्याभ्यास.
शांत चित्ताने तुझ्या पायी,
लागो त्यांना तुझाच ध्यास.

   कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment