Sunday, 3 September 2017

ज्ञानरुपी वसा

स्पर्धेसाठी

विषय - ज्ञानरुपी वसा

विद्यामंदिर हे ज्ञानाचे ,
विद्यार्जनाचाच ईथे ध्यास.
वसा ज्ञानरुपी मिळता येथे,
परीपूर्णतेची लागो आस .

ज्ञानमंदिरातील ज्ञानामुळे,
सार्थक होईल जीवनाचे .
अंगी बाणवू हे सुसंस्कार ,
अंगीकारुन तत्व मूल्यांचे.

समाजभान हे जागवू येथे,
वसा चालवू पुढे असा .
कृतज्ञतेचा भाव मनी हा,
ऊतराई होऊ मी कसा ?

     कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment