Monday, 4 September 2017

शिक्षक दिन

शिक्षक दिन

       हायकू

शिक्षक दिन
गौरव शिक्षकांचा
त्यांच्या कार्याचा

वंदन करु
समाजनिर्मात्याला
त्याच्या वाणीला

विद्यार्थीप्रिय
असतो तो शिक्षक
खरा शासक

ज्ञानपिपासू
आधुनिक ज्ञानाचा
ध्यास हवा हा त्याचा

आज शुभेच्छा
गुरुजनांना देऊ
आशिष घेऊ

   रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment