Tuesday, 26 September 2017

श्रद्धा

स्पर्धेसाठी

       काव्यस्पर्धा

     विषय -- श्रद्धा

श्रद्धा हवी डोळस ,
अंधश्रद्धा न पाळणारी .
विज्ञानाच्या ज्ञानावर ,
खरीखुरी उतरणारी .

श्रद्धा हवी आईबापावर ,
संस्कार रे बाणवण्यासाठी .
अनुकरणातूनच त्यांच्या ,
भावी पिढी घडवण्यासाठी .

श्रद्धा हवी गुरुजनांवर ,
घेतलेले ज्ञान पचवण्यासाठी
समाजात या वावरताना ,
उपयोग याचा करण्यासाठी.

श्रध्दा हवी स्वकर्तृत्वावर ,
आव्हान हो पेलण्यासाठी.
हींमत न हारता कधीही ,
सतत पुढेच जाण्यासाठी.

श्रद्धेने वाढते श्रद्धा ,
प्रेमाने जिंका या जगाला.
क्षणभंगुर या जीवनातून,
सिद्ध करा तुम्ही स्वताःला .

     कवयित्री
 
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

No comments:

Post a Comment