स्पर्धेसाठी
विषय - अवनी
झाडे,वेली,पशु,पक्षी ,
मानवासह सजीव राहती .
अवनीवर या आनंदाने ,
नाचून खेळून बागडती .
जगच सारे हीचे कुटुंब ,
सर्वांवर मायेची पाखर .
सापडे ना ईथे भेदभाव ,
समानतेची असते झालर .
दातृत्वच हीचे ईतके मोठे ,
घेताना हात होतात थिटे .
परतीची ना कधी अपेक्षा ,
आपणच वागतोय खोटे .
ओरबाडण्याची सवय आपली,
वृक्ष तोडून केली उघडी.
सोसतोय आता आपणच ,
दुष्काळ उगारतोय छडी .
जपते ती आपणही जपा ,
भविष्यकाळ सुसह्य बनवा.
अवनी माताच आहे आपली
आयुष्य तिचे सुखी बनवा .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता शिरोळ ,
कोल्हापूर.
No comments:
Post a Comment