स्पर्धेसाठी
अभंग लेखन स्पर्धा
विषय -- महाराष्ट्रातील थोर संत परंपरा
मराठी भाषेचा । गाईला गोडवा ।
माऊली सांगावा । ज्ञानदेव ।।१।।
निवृत्तीनाथ हे । बांधव थोरले ।
आदेश दिले । ज्ञानेश्वरा ।।२।।
मुक्ताई ही थोर । ताटीचे अभंग ।
वर्णिले प्रसंग । ज्ञानबोध ।।३।।
भक्त शिरोमणी । नामदेव संत ।
रंगे कीर्तनात । ही पंढरी ।।४।।
पिकवला मळा। सावता माळ्याने।
गजर मुखाने । विठ्ठलाचा ।।५।।
वऱ्हाडी चोखोबा । वेदनेची कळ।
नको झाला छळ । मानसिक ।।६।
दयेचा सागर । दत्ताला पाहिले ।
धन्य ते जाहले । एकनाथ ।।७।।
अभंग तुक्याचे । थोर साक्षात्कारी
करी बंडखोरी । समाजात ।।८।।
राम हणमंत । उपास्य माणून ।
केले प्रबोधन । रामदास ।।९।।
तेलंगी ब्राह्मण । प्रगटी शेगावी ।
गजानन भावी । महाराज ।।१०।।
निर्गुण श्रद्धेचा । केला पुरस्कार ।
महात्मा तो थोर । बसवाण्णा ।।११।।
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment