Tuesday, 29 May 2018

कविता (विरह )

काव्यप्रज्ञांजली समूह आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धा 2018

   फेरी क्र. 2          30/5/2018

विषय - विरह

आनंदाने व समाधानाने ,
चालले होते आयुष्य माझे .
संसारातील दोन फुलांसह ,
बहरत होते जीवन माझे .

नजर लागली का सुखाला ,
आनंदात असणाऱ्या जीवनाला ?
गेलास अवेळी , अचानक तू ,
वाटे बसली खिळ भविष्याला .

आठवणींने नयनी पाणी ,
सलते ह् दयी  ती वेदना .
साहू कीती निमूटपणे मी ,
मिळणाऱ्या या यातनांना .

अशांत मी , सैरभैर मी ,
वादळातील नांव जशी .
विरहात तुझ्या रे साजना ,
सावरु मी स्वतःला कशी ?

ये परतूनी गरज तुझी ,
भकास या सुनसान जीवनी .
फोडला मी टाहो आकांताने ,
जणू थरथरली ही धरणी .

सावरेन पण वेळ हवा ,
तुझ्याशिवाय जगी जगण्याला .
नाही जमले परतायला तरी ,
बळ दे संकटांशी भिडायला .

कोड क्र. DPASG 1196

कवियीत्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड.

No comments:

Post a Comment